सोलापूर जिल्ह्यात ‘अमृत’च्या माध्यमातून लिंगायत समाजातील अधिकाधिक लाभार्थी घडविणार : आमदार विजयकुमार देशमुख
सोलापूर, दि. १९ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्यातील उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी *‘अमृत’*चे माननीय व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सर हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर उत्तरचे आमदार व पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेब यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी ‘अमृत’ संस्थेच्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. सोलापूर जिल्ह्यात ‘अमृत’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज असून, संस्थेच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ‘अमृत’चे काम प्रभावीपणे पोहोचवून लिंगायत समाजातील जास्तीत जास्त लाभार्थींना संस्थेच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार विजयकुमार देशमुख यांनी विजय जोशी सरांना दिले.
अमृत’ संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करत असून, संस्थेच्या विविध उपक्रमांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. ‘अमृत’ संस्थेला आमचा नेहमीच पाठिंबा राहील आणि संस्थेच्या कार्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच सोलापूरमध्ये लवकरच ‘अमृत’चा भव्य मेळावा आयोजित करू, असेही आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी आश्वासन दिले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment