दारव्हा येथे दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने दारव्हा येथे महिला प्रशिक्षण (EDP) बॅचचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण बॅचमध्ये सुमारे १० महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दारव्हा येथे दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने दारव्हा येथे महिला प्रशिक्षण (EDP) बॅचचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण बॅचमध्ये सुमारे १० महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक सौ. मंजुषा देहंकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. परीक्षितजी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. परीक्षितजी शर्मा यांनी प्रशिक्षणार्थींना अमृतच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या कौशल्यांचा उपयोग करून महिलांनी स्वतःच्या विकासासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, अमृतच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थींनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी महिला, प्रशिक्षक तसेच अमृतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment