जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून समाधान व्यक्त
नांदेड : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी तयार केलेल्या अमृत दिनदर्शिकेचे वितरण नांदेडमधील शासकीय कार्यालयांमध्ये करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना अमृत दिनदर्शिका देण्यात आली. पोलीस दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांना अमृत दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, जिल्हा माहिती कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या नांदेड कार्यालयातही अमृत दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी, अमृतसखी सौ. मनीषा कुनसावळीकर आणि एमसीईडीचे नांदेड समन्वयक विश्वजित कांबळे यांनी दिनदर्शिकांचे वितरण केले. सर्व अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या दिनदर्शिका उपक्रमाचे स्वागत केले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 1 Comments
Shivkumar Shridhar sarkondawar
आपण करत असलेले कार्य फार छान आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Write a Comment