मानोरा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांना देण्यात आली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती - अमृत महाराष्ट्र

मानोरा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांना देण्यात आली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

जिल्हा व्यवस्थापकांनी घेतली भेट

मानोरा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांना देण्यात आली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाशिम : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी मानोरा तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली. कारंजा येथे अमृत संस्थेतर्फे लवकरच सुरू होणाऱ्या आयात-निर्यात प्रशिक्षण कार्यक्रमाबाबतही सांगण्यात आले. लक्ष्यित गटातील व्यक्तींपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचण्याकरिता अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या कल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेची माहिती श्री. देवरे यांना देऊन त्यांना दिनदर्शिका देण्यात आली.

अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अरविंद जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत वाशिम जिल्हा कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, वाशिम
...........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 145 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 145 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement