धामणगाव रेल्वे येथे झालेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
अमरावती : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्याचा कार्यक्रम अमरावतील जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे आयोजित करण्यात आला होता. माहेश्वरी हितकारक संघाच्या वतीने माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सुमारे २५० नागरिक उपस्थित होते.
या वेळी धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सौ. अर्चनाताई रोडे (अडसड), अध्यक्ष अनिल पनपालिया, मुख्य आयोजक अॅड. राजेश चांडक, अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर उपस्थित होते. गोगरकर यांनी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, आर्थिक साह्य, स्वयंरोजगार, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच कर्ज व्याजपरतावा योजनेबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अमृत संस्थेच्या माध्यमातून कसा लाभ घेता येईल, याच्या माहितीसह अर्जप्रक्रिया व पात्रतेच्या अटी याची माहितीही त्यांनी दिली.
या वेळी उपस्थित नागरिकांनी अमृत संस्थेच्या योजनांबाबत विविध प्रश्न विचारले आणि त्यांचे शंकानिरसन करण्यात आले. अनेक युवक व महिलांनी स्वयंरोजगार व प्रशिक्षण योजनांबाबत विशेष रस दाखवला. समाजातील गरजू घटकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा व अमृत संस्थेचा लाभार्थी हा रोजगार शोधणारा नव्हे, तर रोजगार देणारा उद्योजक व्हावा, या उद्देशाने अमृत संस्था कार्य करत असल्याचे केदार गोगरकर यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये अमृत संस्थेच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अमृत संस्थेच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ समाजाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अध्यक्ष अनिल पनपालिया यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, या विषयाबद्दल अनभिज्ञ असलेल्या खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित गटाला गावखेड्यात फिरून या योजनांची माहिती दिल्याबद्दल अॅड. राजेश चांडक यांनी अमृत संस्थेचे कौतुक केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,
आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,
टोपेनगर, अमरावती
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment