नागरिकांना योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी मोठा उपयोग होणार असल्याचे मत व्यक्त
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रकाशित केलेल्या अमृत दिनदर्शिकेचे जालना जिल्ह्यात उत्साहात वाटप करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेच्या सर्व योजना एका ठिकाणी, सोप्या व सविस्तर पद्धतीने मांडण्यात आल्याने सर्व अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
दिनदर्शिका पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेचा हा उपक्रम अत्यंत अभिनव, उपयुक्त व जनसामान्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा असल्याचे मत व्यक्त केले. विविध योजना, त्यांची उद्दिष्टे, पात्रता निकष व लाभ घेण्याची प्रक्रिया एकाच दिनदर्शिकेत समाविष्ट केल्यामुळे नागरिकांना योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
ही अमृत दिनदर्शिका संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारली असून, सध्या तिचे वितरण जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. या दिनदर्शिकेमुळे जालना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती अधिक सुलभपणे मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे. व्याजपरतावा योजना, कौशल्यविकास व विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासासंबंधीच्या प्रशिक्षणांची माहिती सविस्तरपणे दिनदर्शिकेत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये योजनांबाबत जनजागृती वाढण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
अमृत संस्थेच्या विविध योजनांची अधिक माहिती व लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जिल्हा कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी केले आले आहे.
कार्यालयाचा पत्ता :
अमृत संस्थेचे जालना जिल्हा कार्यालय,
दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.
संपर्क :
नितीन खेकाळे - 7391065474
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment