अमृत संस्थेचे उपक्रम उपयुक्त आणि काळाची गरज ओळखून आखलेले - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेचे उपक्रम उपयुक्त आणि काळाची गरज ओळखून आखलेले

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केले कौतुक आणि दिले सहकार्याचे आश्वासन

अमृत संस्थेचे उपक्रम उपयुक्त आणि काळाची गरज ओळखून आखलेले मुख्य फोटो
मुख्य फोटो

बीड : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल समाजघटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी बीड येथे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांची सदिच्छा भेट घेतली.अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी व अमृतमित्र सुमित धिरडे यांनी आमदार पंडित यांना अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. अमृत संस्था कोणत्या लक्ष्यित गटासाठी कार्य करते, समाजातील कोणत्या घटकांसाठी हे उपक्रम राबवले जात आहेत, तसेच या योजनांमधून युवक-युवती, उद्योजक व गरजू घटकांना कसा लाभ मिळतो, याबाबत सविस्तर चर्चा झाली.

या वेळी वीर सावरकर प्रतिष्ठानचे डॉ. अजिंक्य पांडव, तसेच सामाजिक कार्यकर्ते अनुप मंत्री उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही अमृत संस्थेच्या कार्याबाबत माहिती घेऊन सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला. अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती ऐकून आमदार विजयसिंह पंडित यांनी उत्सुकता दर्शवली. समाजाच्या गरजेनुसार खुल्या प्रवर्गासाठी राबविण्यात येणारे अमृतचे उपक्रम उपयुक्त असून, काळाची गरज ओळखून आखलेले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या उपक्रमांसाठी पुढील काळात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

अमृत संस्थेविषयी 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in



Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 06:51 PM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 06:51 PM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement