परतवाडा येथे कायदेतज्ज्ञ आणि सनदी लेखापालांकडून उपक्रमाचे कौतुक
अमरावती : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने नागरिकांसाठी एक विशेष माहितीपर दिनदर्शिका तयार करण्यात आली असून, सध्या तिचे राज्यातील विविध भागांमध्ये वितरण सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. संदीप रेलवाणी, तसेच सनदी लेखापाल पराग गुप्ता यांनी अमृत दिनदर्शिकेचे स्वागत करून या उपक्रमाचे कौतुक केले.
अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी, हा या दिनदर्शिकेचा मुख्य उद्देश आहे. या दिनदर्शिकेमध्ये हिंदू पंचांगाचाही समावेश करण्यात आला असून, तिथी, सण, उत्सव यांची ठळक नोंद देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही दिनदर्शिका एप्रिल २०२७ पर्यंतची म्हणजे १६ महिन्यांची आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांकडून या दिनदर्शिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, माहितीपूर्ण व उपयुक्त उपक्रम म्हणून तिचे स्वागत केले जात आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या योजना थेट सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न उपयुक्त ठरत आहे.
संपर्क : ऋषीकेश कथलकर 7249451152
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment