अचलपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रूपाली माथने यांचे अमृत संस्थेतर्फे अभिनंदन - अमृत महाराष्ट्र

अचलपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रूपाली माथने यांचे अमृत संस्थेतर्फे अभिनंदन

संस्थेच्या कार्याची केली प्रशंसा

अचलपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा  सौ. रूपाली माथने यांचे अमृत संस्थेतर्फे अभिनंदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

अचलपूर (जि. अमरावती) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये नुकत्याच नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या सौ. रूपाली माथने यांची अमृत संस्थेतर्फे भेट घेण्यात आली. अमृत संस्थेतर्फे त्यांचा अभिनंदनपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अमृत दिनदर्शिकाही त्यांना देण्यात आली. अमृत संस्थेच्या सर्व योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. अमृत संस्था खुल्या गटातील लक्ष्यित समाजासाठी करत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.

अमृत संस्थेविषयी 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,

आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,

टोपेनगर, अमरावती

ऋषिकेश कथलकर - 724951152 

केदार गोगरकर - 9112227635

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

Publisher: ऋषिकेश कथलकर News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 02:30 PM News publication time | Views: 482 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: ऋषिकेश कथलकर News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 02:30 PM News publication time | Views: 482 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement