अमृत दिनदर्शिकेचे वितरण
नागपूर : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी तयार केलेली अमृत दिनदर्शिका नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे यांना भेट म्हणून देण्यात आली. यावेळी श्री. खांडे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच या योजनांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वेळी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, तसेच जिल्हा उपव्यवस्थापिका सौ. वृषाली सवनकर हे दोन्ही अधिकारी उपस्थित होते. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
संपर्क :
हर्षल गद्रे - ९११२२२८७७३
नागपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा कार्यालय,
शिवाजीनगर, ८०/बी, पहिला मजला, नागपूर.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment