आवश्यक त्या सहकार्याचे आश्वासन
जालना : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तयार केलेली दिनदर्शिका जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांना भेट देण्यात आली. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे आणि उपव्यवस्थापक चिंतेश जोशी उपस्थित होते. अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या वेळी देण्यात आली. उद्योजकता विकास, आयात–निर्यात प्रशिक्षण, कौशल्यविकास, स्वयंरोजगार निर्मिती, तसेच युवक व महिलांसाठी रोजगाराच्या संधी याबाबतची माहिती या वेळी देण्यात आली. जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचा लाभ युवक, उद्योजक व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे मत जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अमृत संस्थेविषयी...
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. या जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment