प्रशिक्षण कार्यक्रमांतून अमृत घडवत आहे उद्योजकांची फळी - अमृत महाराष्ट्र

प्रशिक्षण कार्यक्रमांतून अमृत घडवत आहे उद्योजकांची फळी

क्षमताबांधणी प्रशिक्षणार्थींना अमरावतीत प्रमाणपत्र वितरण

प्रशिक्षण कार्यक्रमांतून अमृत घडवत आहे उद्योजकांची फळी  मुख्य फोटो
प्रशिक्षण कार्यक्रमांतून अमृत घडवत आहे उद्योजकांची फळी  अतिरिक्त फोटो

अमरावती : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयात क्षमताबांधणी प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात आला होता. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना नुकतीच प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कौशल्यवृद्धी, क्षमताविकास, आर्थिक व्यवस्थापन आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 'प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. त्याचा लाभ घेऊन आपल्याला उद्योजकांची फळी निर्माण करायची आहे,' असे प्रतिपादन अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी व्यक्त केले.

'प्रत्येक प्रशिक्षणार्थीने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि समाजासमोर आदर्श निर्माण करावा,' असे उद्गार महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) प्रकल्पाधिकारी राजेश सुने यांनी व्यक्त केले. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, 'एमसीईडी'चे ऑर्गनायझर स्वप्नील इसळ उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले. 

'अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजातील विविध घटकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहेत. विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम अमृत कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत येत्या काळात राबवण्यात येणार असून, जास्तीत जास्त जणांनी याचा लाभ घ्यावा,' असे आवाहन अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी केले आहे.

केदार गोगरकर - ९११२२२७६३५

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 665 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 665 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement