खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना 'ईडीपी' कार्यक्रमातून मिळणार संपूर्ण मार्गदर्शन
बुलढाणा : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, लक्ष्यित समाजातून उद्योजक घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रम अर्थात ईडीपी राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातही विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ब्राह्मण, मारवाडी, गुजराथी आदींसह जवळपास २२ जातींमधील युवक, महिला, व्यापारी आणि नवउद्योजकांना याद्वारे व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले व्यवसाय नियोजन, भांडवल उभारणी, शासकीय योजना, कर्ज सुविधा, मार्केटिंग, व्यवस्थापन कौशल्य व प्रत्यक्ष उद्योगसंधी याबाबत सखोल व व्यावहारिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परंपरागत व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मण व मारवाडी समाजासोबतच इतर सर्व समाजातील नवउद्योजकांनीही याद्वारे आधुनिक व्यवसायसंधींचा लाभ घ्यावा, नव्या पिढीला उद्योगाकडे वळवावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अमृत संस्थेच्या माध्यमातून होणारा हा ईडीपी कार्यक्रम रोजगार देणारे उद्योजक घडवण्यावर भर देणार आहे. लघुउद्योग, सेवा उद्योग, कृषिपूरक व्यवसाय, ट्रेडिंग, स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी अमृत संस्थेचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क :
जिग्नेश कमानी : 9112227637
बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता :
अमृत जिल्हा कार्यालय,
305, फ्लॅट नंबर, तिसरा मजला,
बुलढाणा प्राइड बिल्डिंग,
तहसील कार्यालयासमोर,
बुलढाणा – 4443001
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment