सर्व योजनांची घेतली माहिती
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक सबलीकरणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी नव्या लाभार्थ्यांनी नुकतीच संस्थेच्या अमरावती कार्यालयाला भेट दिली.
या भेटीमध्ये लाभार्थ्यांना अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती देण्यात आली. विविध योजना, उपक्रम, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, आवश्यक पात्रतेच्या अटी, तसेच योजनांमधून मिळणाऱ्या लाभांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून समजावून सांगण्यात आली. या प्रसंगी सर्व लाभार्थ्यांना अमृत दिनदर्शिकेचे वितरणही करण्यात आले.
या कार्यक्रमाला कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्यविकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक साह्याच्या उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले. या भेटीमुळे लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची स्पष्ट व विश्वासार्ह माहिती मिळाली असून, भविष्यात अधिकाधिक पात्र नागरिकांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
केदार गोगरकर - ९११२२२७६३५
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment