कौशल्यप्राप्ती कराच; पण व्यावसायिक दृष्टिकोन मजबूत करा - अमृत महाराष्ट्र

कौशल्यप्राप्ती कराच; पण व्यावसायिक दृष्टिकोन मजबूत करा

परतवाडा येथील ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्गात ऋषीकेश कथलकर यांचे आवाहन

कौशल्यप्राप्ती कराच; पण व्यावसायिक दृष्टिकोन मजबूत करा मुख्य फोटो
कौशल्यप्राप्ती कराच; पण व्यावसायिक दृष्टिकोन मजबूत करा अतिरिक्त फोटो

परतवाडा (अमरावती) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने परतवाडा येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक ऋषीकेश कथलकर यांनी या वर्गाला भेट देऊन प्रशिक्षण पद्धतीची पाहणी केली. तसेच प्रशिक्षणार्थींचे मनोगत ऐकले. प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून त्यांनी कौशल्यांबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षण घेत असताना मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करून स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन कथलकर यांनी केले. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठीदेखील अमृत संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे व्यवसाय उभारणार असल्याची हमी दिली. अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याची भावना प्रशिक्षक ज्योत्स्ना राऊत व्यक्त केली.

केदार गोगरकर - ९११२२२७६३५

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 01:17 PM News publication time | Views: 82 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 01:17 PM News publication time | Views: 82 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement