अमरावती जिल्हा कौशल्यविकास सहायक आयुक्तांकडून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक - अमृत महाराष्ट्र

अमरावती जिल्हा कौशल्यविकास सहायक आयुक्तांकडून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक

सहकार्याचे दिले आश्वासन

अमरावती जिल्हा कौशल्यविकास सहायक आयुक्तांकडून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक मुख्य फोटो
अमरावती जिल्हा कौशल्यविकास सहायक आयुक्तांकडून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी अमरावती जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी अमृत विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी सहायक आयुक्तांशी विविध कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योजकता विषयक उपक्रमांबाबत चर्चा केली. युवक-युवतींना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करणे याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला. या वेळी अमृत संस्थेच्या कार्याची माहिती देऊन अमृत दिनदर्शिका सहायक आयुक्तांना भेट म्हणून प्रदान करण्यात आली. या वेळी बारस्कर यांनी अमृत संस्थेच्या कार्याला सहकार्य करणार असल्याचे सांगून, शुभेच्छा दिल्या.

Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 07:10 PM News publication time | Views: 113 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 07:10 PM News publication time | Views: 113 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement