तुम्हीच व्हा तुमच्या यशाचे शिल्पकार! अमृत संस्थेच्या निःशुल्क व्यावसायिक प्रशिक्षणांचा घ्या लाभ - अमृत महाराष्ट्र

तुम्हीच व्हा तुमच्या यशाचे शिल्पकार! अमृत संस्थेच्या निःशुल्क व्यावसायिक प्रशिक्षणांचा घ्या लाभ

छत्रपती संभाजीनगरमध्ये नावनोंदणी सुरू; खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना सुसंधी

तुम्हीच व्हा तुमच्या यशाचे शिल्पकार! अमृत संस्थेच्या निःशुल्क व्यावसायिक प्रशिक्षणांचा घ्या लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.

अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील युवक व युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी केले आहे. या प्रशिक्षण योजनांमधून प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यास, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या योजनेअंतर्गत अमृत उद्योग कौशल्यवर्धन, अमृत सूर्यमित्र, अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर), अमृत बेकरी, तसेच अमृत आयात–निर्यात प्रशिक्षण असे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असून, हे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत आहेत.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, भूमिहार, हिंदू नेपाळी, कानबी, एलमार आदी २४ जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले नागरिक अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अमृत कार्यालयाशी संपर्क साधून या प्रशिक्षण योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्कर रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

रामेश्वर साळुंके - 8010095930

अमृतमित्र

मंजू कुलकर्णी - 9404593726

अमृतसखी

ऋचा शर्मा - 7709080073

अमृतसखी

कार्यालय पत्ता :

विभागीय व जिल्हा कार्यालय, अमृत,

पुंडलिक नगर रोड, सेक्टर–4, सिडको,

हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ,

छत्रपती संभाजीनगर – 431009



Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 08:14 PM News publication time | Views: 458 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 08:14 PM News publication time | Views: 458 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement