पेठवडगावमध्ये ब्राह्मण समाजाच्या अमृत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद - अमृत महाराष्ट्र

पेठवडगावमध्ये ब्राह्मण समाजाच्या अमृत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

समाजबांधवांना देण्यात आली खुल्या प्रवर्गासाठीच्या विविध योजनांची माहिती

पेठवडगावमध्ये ब्राह्मण समाजाच्या अमृत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मुख्य फोटो
पेठवडगावमध्ये ब्राह्मण समाजाच्या अमृत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद अतिरिक्त फोटो

पेठवडगाव (जि. कोल्हापूर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे ब्राह्मण समाजातर्फे २७ जानेवारीला अमृत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना विविध योजना आणि अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

ब्राह्मण समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, समाजातील प्रत्येक घटकाचा आवश्यक कौशल्यविकास घडवून आणण्यासाठी, तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे आणि सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अमृत संस्थेकडून विविध योजना राबवल्या जात असल्याचे जोशी यांनी सांगितले. उद्योजक घडवण्यासाठी अमृत संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती, अनुदानविषयक मार्गदर्शन, उद्योजकता विकास प्रशिक्षणा कार्यक्रम, शेती व्यवसायाशी संबंधित योजना, तसेच पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींसाठी असलेल्या विशेष योजना आदींची माहिती देण्यात आली. यामधून समाजबांधवांना आत्मनिर्भरतेकडे कशी वाटचाल करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अमृत महाराष्ट्र, अमृतपेठ व अमृत पर्यटन या संकल्पनांची माहितीही देण्यात आली. “अमृत आता तुमच्या दारी आले आहे. तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेत, तर तुम्ही यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू,” असा विश्वास जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी उपस्थितांना दिला. विद्यार्थी, तरुण, महिला व उद्योजक अशा सर्व स्तरांसाठी अमृत संस्था कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या मेळाव्याला ४६ जण उपस्थित होते. उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन अमृत दिनदर्शिकेचे वितरणही करण्यात आले.

उपस्थितांनी आपल्या शंका मांडून अमृत संस्थेविषयी अधिक माहिती घेतली. हा मेळावा समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागाने व संवादात्मक वातावरणात पार पडला. आज दिलेला वेळ भविष्यात नवी दिशा, ऊर्जा व ओळख निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास पेठवडगाव ब्राह्मण संघाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संघाचे अध्यक्ष संजू बुवा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in



Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 02:39 PM News publication time | Views: 334 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 02:39 PM News publication time | Views: 334 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement