सिंधी समाजातील महिलांनी जाणून घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती - अमृत महाराष्ट्र

सिंधी समाजातील महिलांनी जाणून घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

अमरावतीत झाली विशेष बैठक

सिंधी समाजातील महिलांनी जाणून घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या अमरावती कार्यालयाने शहरातील रामपुरी कॅम्प परिसरातील कृष्णानगर येथे सिंधी समाजातील महिलांशी विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमृत संस्थेच्या विविध योजना, कौशल्यविकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर उपस्थित होते. अमृत संस्थेच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन गोगरकर यांनी महिलांना केले. प्रशिक्षणानंतर उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सहकार्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

कार्यक्रमात सिंधी समाजातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि अमृत संस्थेच्या योजनांबाबत उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. अशा संवादात्मक कार्यक्रमांमुळे समाजातील महिलांपर्यंत शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

अधिक माहितीसाठी संपर्क :

केदार गोगरकर - 9112227635 

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय, घर क्रमांक ३३,

आशीर्वाद बिल्डिंग, विदर्भ हाउसिंग कॉलनी, 

मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,

अमरावती - ४४४६०२

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 12:32 PM News publication time | Views: 409 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 12:32 PM News publication time | Views: 409 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement