गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी केले अमृत संस्थेचे कौतुक - अमृत महाराष्ट्र

गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी केले अमृत संस्थेचे कौतुक

सहकार्याचे दिले आश्वासन

गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी केले अमृत संस्थेचे कौतुक मुख्य फोटो
मुख्य फोटो

गडचिरोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गासाठी विविध योजना व उपक्रम राबवते. या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. अमृत संस्थेचे गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी यांनी सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत यांची भामरागडमध्ये भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. अमृत संस्थेच्या विविध योजना विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि अमृत संस्थेने राबवलेल्या सर्व उपक्रमांची त्यांना माहिती देण्यात आली. अमृत संस्था लक्ष्यित गटाला एकत्र आणण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या उन्नतीसाठी सतत कार्य करते, याची माहिती त्यांना देण्यात आली. अमर राऊत यांनी अमृत संस्थेचे खूप कौतुक केले आणि अमृत संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 04-02-2026 News publication date | Time: 10:33 AM News publication time | Views: 253 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news
Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 04-02-2026 News publication date | Time: 10:33 AM News publication time | Views: 253 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement