धामणगाव रेल्वे येथे अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जागर - अमृत महाराष्ट्र

धामणगाव रेल्वे येथे अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जागर

विशेष बैठकीत देण्यात आली योजनांची माहिती; मिळाला सकारात्मक प्रतिसाद

धामणगाव रेल्वे येथे अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जागर मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या अमरावती कार्यालयातर्फे जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या कौशल्यविकास, उद्योजकता विकास आणि प्रशिक्षण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच युवक, महिला व विविध लक्ष्यित गटांसाठी अमृत संस्था कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते, याबाबत मार्गदर्शन केले.

नागरिक, व्यावसायिक व अमृत संस्थेच्या योजनांमध्ये रस असलेल्या संभाव्य लाभार्थ्यांनी अमृत संस्थेच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच प्रशिक्षण व योजनांचा लाभ घेण्याची इच्छा व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 153 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 153 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement