अमरावतीत मार्चमध्ये अमृतपेठ प्रदर्शन; नवउद्योजकांना ऑनलाइन व ऑफलाइन बाजारपेठ मिळण्यासाठी सुवर्णसंधी - अमृत महाराष्ट्र

अमरावतीत मार्चमध्ये अमृतपेठ प्रदर्शन; नवउद्योजकांना ऑनलाइन व ऑफलाइन बाजारपेठ मिळण्यासाठी सुवर्णसंधी

लवकरात लवकर नोंदणी करण्याचे अमृत संस्थेचे आवाहन

अमरावतीत मार्चमध्ये अमृतपेठ प्रदर्शन; नवउद्योजकांना ऑनलाइन व ऑफलाइन बाजारपेठ मिळण्यासाठी सुवर्णसंधी मुख्य फोटो
अमरावतीत मार्चमध्ये अमृतपेठ प्रदर्शन; नवउद्योजकांना ऑनलाइन व ऑफलाइन बाजारपेठ मिळण्यासाठी सुवर्णसंधी अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातून उद्योजक घडवण्यासाठी आणि त्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत अमरावतीमध्ये सहा ते आठ मार्च या कालावधीत अमृतपेठ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यासाठीची नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असून, अधिकाधिक नवउद्योजकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमृत संस्थेतर्फे सुरू करण्यात आला असून, ऑफलाइन बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष प्रदर्शन भरवले जाते. अमरावतीतील पहिल्या अमृतपेठ प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मार्च महिन्यातील प्रदर्शनासाठी उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सहा ते आठ मार्च २०२६ या कालावधीत अमरावतीतील बडनेरा रोडवरील जाधव पॅलेसमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी सौ. गुंजन शर्मा, तसेच केदार मोरोणे यांनी अमृत कार्यालयात येऊन आपल्या स्टॉलसाठी नोंदणी केली. कॉल करूनही काही जणांनी नोंदणी केली आहे.

नवउद्योजकांना आपल्या उत्पादनांना ऑनलाइन व ऑफलाइन व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ही सुवर्णसंधी असून, स्टॉल बुकिंगसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9527317068, 7249451152

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय, 

घर क्रमांक 33, आशीर्वाद बिल्डिंग,

विदर्भ हाउसिंग कॉलनी, 

मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,

अमरावती - 444602

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 03:03 PM News publication time | Views: 465 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 03:03 PM News publication time | Views: 465 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement