'अमृत'च्या उद्योजकता विकास कार्यक्रमातून खुल्या प्रवर्गाला नव्या प्रकाशकिरणांचे तेज - अमृत महाराष्ट्र

'अमृत'च्या उद्योजकता विकास कार्यक्रमातून खुल्या प्रवर्गाला नव्या प्रकाशकिरणांचे तेज

जळगावमधील प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचे मत

'अमृत'च्या उद्योजकता विकास कार्यक्रमातून खुल्या प्रवर्गाला नव्या प्रकाशकिरणांचे तेज मुख्य फोटो
'अमृत'च्या उद्योजकता विकास कार्यक्रमातून खुल्या प्रवर्गाला नव्या प्रकाशकिरणांचे तेज अतिरिक्त फोटो

जळगाव : 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) कार्यक्रमाच्या माध्यमातून अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या जीवनाला नव्या प्रकाशकिरणांचे तेज देत आहे,' असे प्रतिपादन ब्रह्मर्षी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव वाघ यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत संस्थेच्या ईडीपी कार्यक्रमाच्या जळगावातील वर्गाचा प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या (केसीई) 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च' (आयएमआर) या कॉलेजमध्ये हा वर्ग सुरू झाला आहे. उद्घाटनावेळी केसीई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक प्रा. संजय पावडे, आयएमआर कॉलेजचे संचालक डॉ. बी. व्ही. पवार, प्रशिक्षक प्रा. नितीन मठकरी उपस्थित होते. १७ प्रशिक्षणार्थ्यांनी ईडीपी वर्गाला प्रवेश घेतला आहे.

'अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचे काम आज समाजात दिसत आहे,' असे मृणालिनी फडणवीस या वेळी म्हणाल्या.

'शासन खुल्या प्रवर्गासाठीही कार्यरत आहे, तसेच जळगाव जिल्ह्यातही काम करत आहे, हे अमृत संस्थेच्या व्यवस्थापकांच्या भेटीमधून वेळोवेळी कळत होते. परंतु या समाजाला निःशुल्क प्रशिक्षण घेता येत आहे, हे आज या कार्यक्रमात प्रत्यक्षच पाहायला मिळाले,' असे डॉ. बी. व्ही. पवार म्हणाले.

'आमच्या संस्थेच्या अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटरअंतर्गत हा प्रशिक्षण वर्ग सुरू झाला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना अमृत ही संस्था निःशुल्क पद्धतीने प्रशिक्षण देते, ही खूपच आनंदाची बाब आहे,' असे मत प्रा. संजय पावडे यांनी व्यक्त केले.

अमृत संस्थेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे, उपव्यवस्थापक दीपक गुप्ता आणि अमृतमित्र या वेळी उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 04:36 PM News publication time | Views: 143 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 04:36 PM News publication time | Views: 143 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement