उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली कागदपत्रांची माहिती - अमृत महाराष्ट्र

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली कागदपत्रांची माहिती

अमृत संस्थेच्या नांदेडमधील प्रशिक्षणवर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली कागदपत्रांची माहिती मुख्य फोटो
उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली कागदपत्रांची माहिती अतिरिक्त फोटो

नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या नांदेड कार्यालयात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणवर्ग (ईडीपी) सध्या सुरू आहे. त्या वर्गात नांदेड येथील सेतू सुविधा केंद्राचे कपिल शेंगोळे यांनी सरकारी योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, अमृतसखी मनीषा कुनसावळीकर, संजना कुलकर्णी, अमृतमित्र प्रशांत कापसे उपस्थित होते.

कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा माहितीच्या अभावामुळे अनेकांची धावपळ होते; पण या वर्गात ती प्रक्रिया सोपी करून सांगितली गेल्यामुळे सर्वांच्या ज्ञानात भर पडली. त्या माहितीचा सारांश असा -

सामान्यतः कोणत्याही योजनेसाठी खालील कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक असते.

७/१२ उतारा आणि ८-अ उतारा : अलीकडील काळातील (डिजिटल सिग्नेचर असलेला).

​फेरफार उतारा : जमिनीच्या व्यवहारांची नोंद पाहण्यासाठी.

जातीचा दाखला : आरक्षित प्रवर्गातील योजनांसाठी

​बँक पासबुक : आधार लिंक असलेल्या खात्याच्या पासबुकची प्रत (थेट लाभ हस्तांतरणासाठी).

​स्वयंघोषणापत्र : अर्जासोबत जोडण्यासाठी.

​कोणतीही कागदपत्रे सादर करताना ती 'अपडेटेड' अर्थात ताजी असावीत (उदा. उत्पन्नाचा दाखला चालू आर्थिक वर्षाचाच असावा).

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 03:28 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 03:28 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement