अमृत संस्थेतर्फे आयोजित विशेष शिबिराला चांगला प्रतिसाद
यवतमाळ : अमृत या राज्य शासनाच्या यवतमाळ जिल्हा कार्यालयात भारतीय स्टेट बँकेतर्फे (एसबीआय) उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरामध्ये एसबीआयचे अधिकारी सौरभ चिवरकर यांनी नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे उद्योग आधार, कर्ज, तसेच उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व कर्जसुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कर्जप्रक्रियेची माहिती, पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि कर्जमंजुरीसाठी आवश्यक बाबी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिराला अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील सुमारे ६० लाभार्थी आणि इच्छुक उद्योजकांची उपस्थिती होती. उपस्थितांनी आपल्या उद्योगविषयक शंकांचे निरसन करून घेतले. अमृत संस्थेच्या यवतमाळ जिल्हा कार्यालयाच्या या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजकांना स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त झाली.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-१,
अवधूतवाडी, तिवारी चौक,
यवतमाळ - ४४५ ००१
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment