अमृत उद्यम प्रशिक्षण कार्यक्रमाची सिल्लोडमध्ये सुरुवात करण्यात आली आहे.
अमृत उद्यम प्रशिक्षण कार्यक्रमाचा सिल्लोडमध्ये प्रारंभ.
सिल्लोड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’तर्फे राबविण्यात येणाऱ्या अमृत उद्यम प्रशिक्षण कार्यक्रमाला (EDP) सिल्लोड येथे सुरुवात झाली. शास्त्रीनगर येथील राज कॉम्प्युटर्स येथे आयोजित या कार्यक्रमाचा शुभारंभ अमृत संस्थेचे राज्य समन्वयक दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून विभाग व्यवस्थापक अमित सामंत आणि विभाग उपव्यवस्थापक ओंकार शेटे उपस्थित होते. याव्यतिरिक्त व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, सचिन उपळीकर, संदीप झालाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक, युवती आणि महिलांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी अमित सामंत यांनी उद्योगाची निवड, उद्योजकीय मानसिकता, व्हिजन-मिशन स्टेटमेंटचे महत्त्व, नव्या युगातील उद्योजकांसाठी आवश्यक गुण तसेच व्यवसायाच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक आणि प्रेरणादायी सादरीकरणाला लाभार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ओंकार शेटे यांनीही उद्योजकतेसाठी आवश्यक नियोजन, सातत्य आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले. सहभागी लाभार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
अमृतच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योगाची निवड, आवश्यक शासकीय परवानग्या, बँक कर्ज, विविध शासकीय योजना, ब्रँडिंग, मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, विक्री व्यवस्थापन आणि निर्यात याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. तसेच उद्योग सुरू होईपर्यंत आणि त्यानंतरही लाभार्थ्यांना मार्गदर्शन व पाठपुरावा केला जातो, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे-
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment