उदगीरमध्ये आर्य वैश्य समाजाकडून अमृत संस्थेच्या योजनांचे स्वागत - अमृत महाराष्ट्र

उदगीरमध्ये आर्य वैश्य समाजाकडून अमृत संस्थेच्या योजनांचे स्वागत

अमृत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

उदगीरमध्ये आर्य वैश्य समाजाकडून अमृत संस्थेच्या योजनांचे स्वागत मुख्य फोटो
उदगीरमध्ये आर्य वैश्य समाजाकडून अमृत संस्थेच्या योजनांचे स्वागत अतिरिक्त फोटो

उदगीर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. उदगीरमध्ये आर्य वैश्य समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात अमृत मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचवण्यात आली. या कार्यक्रमाला आर्य वैश्य समाजाचा मोठा प्रतिसाद लाभला. यातून तरुणांनी आणि इच्छुकांनी उद्योजकतेकडे पाऊल टाकण्याचा निर्धार केला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष किशोर पंदिलवार होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की "आजच्या काळात केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय उभा करणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी 'अमृत'सारखी संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे."

'अमृत महाराष्ट्र'चे आदित्य कुलकर्णी यांनी अमृत संस्था नेमकी कशी कार्य करते, या संस्थेची निर्मिती का झाली आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीची दारे कशी उघडली जाऊ शकतात, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. "तुमची जिद्द आणि अमृत संस्थेची साथ असेल तर प्रगती निश्चित आहे," असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजना, प्रशिक्षणाचे प्रकार आणि आर्थिक मदतीचे निकष यावर सविस्तर सादरीकरण केले. उपस्थित असलेल्या १५०हून अधिक समाजबांधवांनी अतिशय कुतुहलाने या योजना जाणून घेतल्या.

या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी उदगीर शहरातील संपूर्ण आर्य वैश्य समाज सज्ज झाला आहे. अनेक तरुणांनी तात्काळ नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याची इच्छा व्यक्त केली. अमृतमित्र प्रशांत कापसे यांनी सर्व उपस्थितांची नोंदणी करून घेतली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 18-02-2026 News publication date | Time: 08:17 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 18-02-2026 News publication date | Time: 08:17 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement