'वेगाने आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या 'अमृत'च्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधा' - अमृत महाराष्ट्र

'वेगाने आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या 'अमृत'च्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधा'

गडहिंग्लजमध्ये झालेल्या अमृत महामेळाव्यात व्यवस्थापकीय संचालक विजय जोशींचे आवाहन; मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

'वेगाने आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या 'अमृत'च्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधा' मुख्य फोटो
'वेगाने आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या 'अमृत'च्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधा' अतिरिक्त फोटो

गडहिंग्लज (कोल्हापूर) : 'राज्य शासनाची अमृत ही स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी थेट बाजारपेठ, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म इत्यादींपासून पर्यटन, उद्योजकता प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांतील योजना राबवत आहे. तसेच, अमृत संस्थेचा योजनांच्या अंमलबजावणीचा वेगही जलद आहे. त्यामुळे संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी या योजनांची माहिती घ्यावी, स्वतःचे बलस्थान समजून घेऊन आपल्यासाठी अनुरूप अशा योजनांचा लाभ घ्यावा, तसेच इतरांपर्यंतही याची माहिती पोहोचवून एकंदर समाजाच्या उन्नतीचे उद्दिष्ट साध्य करण्यास हातभार लावावा,' असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले. गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे ब्राह्मण संघाच्या माध्यमातून १८ फेब्रुवारीला अमृत संस्थेच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी जोशी बोलत होते. 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या योजनांविषयी जानजागृतीकरिता आयोजित करण्यात आलेल्या या महामेळाव्याला परिसरातील ब्राह्मण, तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील अन्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांच्यासह तहसीलदार, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आदी मान्यवरही उपस्थित होते.

विजय जोशी यांनी अमृत संस्थेतर्फे विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. योजनांचा आपण लाभ घेऊन इतरांनाही त्याबद्दल सांगावे, असे आवाहनही करण्यात आले. जोशी यांनी उपस्थितांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देऊन शंकानिरसन केले. तसेच, अमृत सदैव तुमच्यासोबत आहे, असा विश्वासही त्यांना दिला. कोणाकडे काही नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या सुचवण्याचे आवाहनदेखील या वेळी जोशी यांनी केले.

अमृत संस्थेच्या विविध योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या मेळाव्यामुळे मोठा हातभार लागला आहे. अनेकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचा मानस व्यक्त केला.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सूत्रसंचालन पत्रकार दत्ता देशपांडे यांनी केले. गडहिंग्लज तालुका ब्राह्मण संघाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याबद्दल व अमृत संस्थेबद्दल माहिती दिली. ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 02:36 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 02:36 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement