‘अमृत’मुळे खुल्या प्रवर्गातील गरीब मुले देशविकासासाठी घडतील : जगन्नाथ पाटील - अमृत महाराष्ट्र

‘अमृत’मुळे खुल्या प्रवर्गातील गरीब मुले देशविकासासाठी घडतील : जगन्नाथ पाटील

जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ निवासी (कार्यालयीन) प्रमुख जगन्नाथ शंभू पाटील यांनी आज (११ डिसेंबर) अमृत संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्यालयाला भेट दिली.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ निवासी (कार्यालयीन) प्रमुख जगन्नाथ शंभू पाटील यांनी आज (११ डिसेंबर) अमृत संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्यालयाला भेट दिली. कोरोना काळात पत्नीचे निधन झाल्यापासून जगन्नाथ पाटील ऊर्फ अण्णा जिल्हा संघ कार्यालयात निवासी आहेत. अमृत संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्यालयाच्या शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी आज त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्या वेळी अमृत संस्थेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी त्यांना अमृत संस्थेच्या कार्यालयात आमंत्रित करून त्यांना संस्थेच्या सर्व योजनांची माहिती दिली. त्या वेळी त्यांनी सर्व योजना समजून घेतल्या आणि अमृत संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन आपला अभिप्राय नोंदवहीत लिहिला. त्यांचा अभिप्राय खालीलप्रमाणे –

जन्मजात हुशार, प्रामाणिक, कामसू व्यक्तींना आतापर्यंत सरकारकडून काहीच तांत्रिक किंवा आर्थिक मदत नव्हती. त्यामुळे देशाचे काही गुणवंत लोक बाजूला टाकले जात होते. ‘अमृत’ संस्थेच्या योजनांमुळे सवर्ण समाजातील गरीब मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण व आर्थिक मदत मिळून ते देशाच्या विकासाच्या कामात येतील व त्यांचाही वैयक्तिक विकास होऊन त्यांच्या मनातून दुर्लक्षित राहिल्याची बोचणी दूर होईल.
……..
अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 11-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 11-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement