अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सावरकरांच्या तेजस्वी विचारांचे स्मरण

अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात आज (२६ फेब्रुवारी) स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रप्रेम, त्याग आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणाऱ्या सावरकरांच्या तेजस्वी स्मृतींना या वेळी उजाळा देण्यात आला.

सुरुवातीला अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी आणि रायझिंग स्टार किड्स स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा अमोल कावरे यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी व शिक्षकांनीही सावरकरांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी मान्यवरांनी सावरकरांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेतला. सावरकरांचे जाज्ज्वल्य विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्ज्वलित करणारे आहेत. देशासाठी कठोर कारावास भोगत असतानाही सावरकरांनी धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास यांची कास धरली. संघर्षातही न डगमगता ध्येयासाठी झटण्याची त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळते. सावरकरांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक एकात्मता आणि स्वाभिमान यांचे महत्त्व अधोरेखित केले. अंधश्रद्धा, जातिभेद आणि अन्याय यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवला. राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांनी शिक्षण, शिस्त आणि संघटन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. सावरकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या अशा विविध पैलूंचे या वेळी स्मरण करण्यात आले.

या वेळी अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृतमित्र रामेश्वर साळुंके, अमृतसखी मंजू कुलकर्णी, अमृतसखी रुचा शर्मा, तसेच शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 26-02-2026 News publication date | Time: 02:07 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 26-02-2026 News publication date | Time: 02:07 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement