अकोला जिल्ह्यात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरू - अमृत महाराष्ट्र

अकोला जिल्ह्यात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरू

लवकरच होणार प्रशिक्षणाची सुरुवात

अकोला जिल्ह्यात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरू मुख्य फोटो
मुख्य फोटो

अकोला : जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच अकोल्यात सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना उद्योगाभिमुख कौशल्ये शिकवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

या प्रशिक्षणामध्ये संगणक व डिजिटल कौशल्ये, लघुउद्योग व्यवस्थापन, तांत्रिक अभ्यासक्रम, कृषी व पूरक व्यवसाय, तसेच महिलांसाठी विशेष उद्यम मार्गदर्शन अशा विविध विषयांचा समावेश असणार आहे. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष कामावर आधारित शिक्षण दिले जाणार असून, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. तसेच सहभागी उमेदवारांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार युवकांना स्वावलंबनाची दिशा मिळणार असून, स्थानिक उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळही उपलब्ध होणार आहे. उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले आर्थिक नियोजन, विपणन कौशल्ये व शासकीय योजनांची माहिती यांचाही समावेश प्रशिक्षणात करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

नोंदणीकरिता संपर्क : 

अमृत संस्थेचे अकोला जिल्हा कार्यालय - 9112227636

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 02-03-2026 News publication date | Time: 12:14 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 02-03-2026 News publication date | Time: 12:14 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement