नियोजन बैठकीत करण्यात आली चर्चा
परभणी : उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना थेट जोडणारा अमृत संस्थेचा आगळावेगळा उपक्रम म्हणजे अमृतपेठ थेट बाजारपेठ. हा उपक्रम लवकरच परभणीमध्ये राबवला जाणार असून, त्या संदर्भातील नियोजन बैठक नुकतीच पार पडली. अमृतपेठ उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लघुउद्योजकांना स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवण्याचे व्यासपीठ मिळणार असून, स्वदेशी उद्योगांना चालना मिळणार आहे.
परभणी शहरातील एमआयडीसीमधील एलआर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये अमृतपेठ नियोजन बैठक झाली. या बैठकीला अमृत संस्थेच्या पुणे मुख्यालयातून सुमेधा देशपांडे यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला. अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या माध्यमातून स्टॉलधारकांना जास्तीत जास्त नफा कसा मिळवून देता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. स्थानिक लघुउद्योजक, कारागीर आणि उत्पादक या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.
या बैठकीला एल. आर. फार्मास्युटिकलचे संस्थापक डॉ. सुधीर राजूरकर, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. केदार खटिंग (नगरसेवक), शंकर आजेगावकर (नगरसेवक), अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील व्यावसायिक पंकज पुरोहित, पवनकुमार शर्मा, विनोद पुरोहित, निखिल देशपांडे, प्राची वैद्य, माधुरी उमरेकर, रेणुका कुलकर्णी, अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत,
पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला,
परभणी.
मोबाइल : 7391065473
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Ashok U Joshi
आपला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. या मार्गाने सर्व सजाती लोकांना आर्थिक सहाय्य व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे याबद्दल या संस्थेचे मनःपूर्वक धन्यवाद
Write a Comment