एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास 'अमृत' संस्थेतर्फे मिळतो लाभ - अमृत महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास 'अमृत' संस्थेतर्फे मिळतो लाभ

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास 'अमृत' संस्थेतर्फे मिळतो लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनेचाही समावेश आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील विद्यार्थी, युवक, युवती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यास त्यांना अमृत संस्थेकडून प्रोत्साहनात्मक अर्थसाह्य दिले जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी १५ हजार रुपयांचे, तर राजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी १० हजार रुपयांचे लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसाह्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना अर्जदाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संबंधित परीक्षांच्या प्रवेशपत्राची व पूर्वपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (सेल्फ अटेस्टेड) सादर करावी लागते. मुलाखतीसाठीच्या अर्थसाह्याचा लाभ घ्यायचा असेल, तर परीक्षांच्या प्रवेशपत्राची व मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याच्या निकालाची सेल्फ अटेस्टेड प्रत सादर करावी लागते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी https://mahaamrut.org.in/ या अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

नितीन खेकाळे - 7391065474,9130283058

जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत

चिंतेश जोशी - 9421944752

जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Nitin khekale News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 01:03 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news
Publisher: Nitin khekale News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 01:03 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement