महिला दिनानिमित्त हिंगोलीत 'अमृत'तर्फे विशेष कार्यक्रम - अमृत महाराष्ट्र

महिला दिनानिमित्त हिंगोलीत 'अमृत'तर्फे विशेष कार्यक्रम

स्वयंरोजगार आणि उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन

महिला दिनानिमित्त हिंगोलीत 'अमृत'तर्फे विशेष कार्यक्रम मुख्य फोटो
महिला दिनानिमित्त हिंगोलीत 'अमृत'तर्फे विशेष कार्यक्रम अतिरिक्त फोटो

हिंगोली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या हिंगोली जिल्हा कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन समाजाच्या विकासात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले. महिलांनी स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांना विविध स्वयंरोजगार उपक्रम, शासकीय योजना, व्यवसाय सुरू करण्याच्या संधी, तसेच आर्थिक साह्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम उपयुक्त ठरतील, असे प्रातिनिधिक मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण होऊन त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तसेच लक्ष्यित गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 01:39 PM News publication time | Views: 171 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 01:39 PM News publication time | Views: 171 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement