शिवजयंतीनिमित्त 'अमृत'सह अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समर्पण बहुउद्देशीय संस्था, शिवजयंती उत्सव समिती आणि अमृत संस्थेचे यवतमाळ जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ८३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच इतिहासाविषयी त्यांचे ज्ञान वाढावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होऊन राष्ट्रभक्त आणि जागरूक विचारांची पिढी घडावी, हा आयोजकांचा प्रमुख हेतू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-१,
अवधूतवाडी, तिवारी चौक,
यवतमाळ - ४४५ ००१
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment