जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल जाहीर; अमृत संस्थेकडून उत्तीर्ण उमेदवारांना मिळेल अर्थसाह्य - अमृत महाराष्ट्र

जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल जाहीर; अमृत संस्थेकडून उत्तीर्ण उमेदवारांना मिळेल अर्थसाह्य

लवकरात लवकर अमृत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल जाहीर; अमृत संस्थेकडून उत्तीर्ण उमेदवारांना मिळेल अर्थसाह्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

नांदेड : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या स्वायत्त संस्थेतर्फे विविध कौशल्यविकास व अर्थसाह्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जीसीसी-टीबीसी (शासकीय टायपिंग व शॉर्टहँड) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्कपरताव्याच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या जीसीसी-टीबीसी अर्थात टायपिंग व शॉर्टहँड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृत कार्यालयामार्फत अर्थसाह्य योजना राबवली जाते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल. 

विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांच्या आधारे अर्थसाह्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका व इतर आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना कागदपत्रांची सेल्फ अटेस्टेड प्रत जोडणे बंधनकारक आहे.

अमृत संस्थेच्या या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि अधिक माहितीसाठी लवकरात लवकर आपापल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 

अमृत कार्यालय, नांदेड - 7391065472

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 370 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 370 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement