अहिल्यानगरमधील अमृतपेठ थेट बाजारपेठेचे 'अमृत'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक - अमृत महाराष्ट्र

अहिल्यानगरमधील अमृतपेठ थेट बाजारपेठेचे 'अमृत'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक

दर्जेदार उत्पादनांचे स्टॉल्स आणि उत्तम नियोजन

अहिल्यानगरमधील अमृतपेठ थेट बाजारपेठेचे 'अमृत'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मुख्य फोटो
अहिल्यानगरमधील अमृतपेठ थेट बाजारपेठेचे 'अमृत'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अहिल्यानगरमध्ये भरवलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १४ आणि १५ मार्च या दिवशी ग्राहकांनी या प्रदर्शनात दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा आनंद लुटला. अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागाचे प्रमुख मंगेश खाडिलकर आणि अमरावती विभागाचे प्रमुख प्रवीण कोळेश्वर यांनी या प्रदर्शना भेट दिली. या वेळी सर्व स्टॉलधारकांनी त्यांचा विशेष सन्मान करून स्वागत केले. या वेळी अमृतसखी अश्विनी पुसटकर, अमृतसखी गौरी कुलकर्णी, मुकेश साठ्ये, श्रीपाद फाटक, सुरेंद्र देशपांडे, वैभव क्षीरसागर, शशिकांत पालवे, प्रियाताई जानवे, वृषाली भोपे, विद्या काळे, अर्चना पलुस्कर आदी उपस्थित होते. दर्जेदार उत्पादनांचे स्टॉल्स आणि उत्तम नियोजन यामुळे अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या अहिल्यानगर टीमचे विशेष कौतुक केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 15-03-2026 News publication date | Time: 02:05 PM News publication time | Views: 118 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 15-03-2026 News publication date | Time: 02:05 PM News publication time | Views: 118 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement