जळगावमध्ये २१-२२ मार्च रोजी अमृतपेठ थेट बाजारपेठेचे आयोजन - अमृत महाराष्ट्र

जळगावमध्ये २१-२२ मार्च रोजी अमृतपेठ थेट बाजारपेठेचे आयोजन

विविध दर्जेदार खाद्यपदार्थ आणि हाती बनवलेल्या वस्तूंच्या खरेदीची संधी

जळगावमध्ये २१-२२ मार्च रोजी अमृतपेठ थेट बाजारपेठेचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

जळगाव : स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा विशेष उपक्रम राबवला जातो. खोपोली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता २१ आणि २२ मार्च रोजी जळगावमध्ये हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. 

केळी आणि सोन्याची बाजारपेठ म्हणून जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. आता या शहरात अमृतपेठ थेट बाजारपेठ भरवली जाणार आहे. संस्थेच्या लक्ष्यित गटातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि हाती बनवलेल्या वस्तूंची मांडणी या प्रदर्शनात केली जाणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जळगावच्या महापौर सौ. रत्नमाला काळे यांच्या हस्ते होणार आहे. जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा, जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करणवाल, नगरसेविका अ‍ॅड. सुचिता भाटिया-हाडा, अशोक वाघ, कमलाकर फडणवीस, अतुलसिंह हाडा, माजी नगरसेवक पिंटूभाऊ काळे यांच्यासह लक्ष्यित समाजातील अनेक मान्यवर उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. मूकबधिर, तसेच दिव्यांगांचेही विशेष स्टॉल या वेळी असतील.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील वाल्मीक नगरातील अमृतवर्गाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम शुक्ल महाराजांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात अमृतसखी सौ. भावे, सौ. तिवारी यांचा विशेष सहभाग आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठ :

दिवस : २१ व २२ मार्च २०२६ 

स्थळ : बेंडाळे महाविद्यालय, लेवा बोर्डिंग हॉल, जी. एस. ग्राउंडच्या समोर, जळगाव शहर

अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065476, 8237657178

(स्टॉल बुकिंगसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 15-03-2026 News publication date | Time: 09:10 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 15-03-2026 News publication date | Time: 09:10 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement