जिंतूरमध्ये १९ जणींनी घेतला 'अमृत'च्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ - अमृत महाराष्ट्र

जिंतूरमध्ये १९ जणींनी घेतला 'अमृत'च्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ

प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा : रवी कुलकर्णी

जिंतूरमध्ये १९ जणींनी घेतला 'अमृत'च्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ मुख्य फोटो
जिंतूरमध्ये १९ जणींनी घेतला 'अमृत'च्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ अतिरिक्त फोटो

जिंतूर (परभणी) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिंतूर (जि. परभणी) येथे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १४ मार्च २०२६ रोजी त्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. 

या प्रशिक्षणात १९ महिला आणि युवतींनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या महिलांना हेअर स्टाइल, मेकअप, फेशियल, तसेच ग्राहक सेवा यांसारख्या विविध बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. समारोपप्रसंगी बोलताना अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना अमृत संस्थेच्या विविध योजना व प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. 'फक्त प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत,' असे सांगून त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.   

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, 'एमसीईडी'चे प्रकल्प अधिकारी काशिनाथ राठोड हेही या वेळी उपस्थित होते. 

अधिक माहितीसाठी संपर्क :

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, 

जुनी प्रशासकीय इमारत, 

पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.  

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 16-03-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 53 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 16-03-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 53 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement