ऋतुराज पाटीलला दुसरा, तर सायली पाटीलला तिसरा क्रमांक
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अहिल्यानगरमध्ये आयोजित केलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत साईशा भोपे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने जिजाऊमाता यांची वेशभूषा केली होती. द्वितीय क्रमांक ऋतुराज पाटीलला, तर तृतीय क्रमांक सायली पाटीलला मिळाला. अहिल्यानगरमधील ओम एंटरप्रायझेसच्या संचालिका सौ. अनिता हिलगुडे यांच्यातर्फे विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
स्थानिक उत्पादकांच्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत संस्थेतर्फे 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' हा विशेष उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अहिल्यानगरमध्ये १४ व १५ मार्च रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी ग्राहकांना विविध प्रकारची स्वदेशी व घरगुती उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळाली.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769 / 9766622274
पत्ता : अमृत, वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment