ग्राहकांची स्थानिक उत्पादनांना पसंती
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अहिल्यानगरमध्ये दोन दिवसांचे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांनी स्थानिक उत्पादनांची भरभरून खरेदी केली. त्यामुळे सहभागी झालेल्या नवउद्योजकांना या प्रदर्शनातून मोठा आत्मविश्वास मिळाला.
सावेडीमध्ये १४ आणि १५ मार्च रोजी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक उत्पादनांना नागरिकांची पसंती मिळाली. घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, तसेच विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात थाटलेले होते. नवउद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला. मेळाव्यात सहभागी झालेल्या स्टॉलधारकांनी अमृत संस्थेचे आभार मानले. असे उपक्रम पुन्हा आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, अमृतसखी गौरी कुलकर्णी, अमृतमित्र वैभव कुलकर्णी, अमृतमित्र शरद क्षीरसागर यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769 / 9766622274
पत्ता : अमृत, वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment