स्थानिक उत्पादकांना मिळणार ग्राहक आणि ग्राहकांना मिळणार दर्जेदार वस्तूंच्या खरेदीची संधी
भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. उद्योजकतावाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या या संस्थेचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे अमृतपेठ थेट बाजारपेठ. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, खोपोली, कोल्हापूर, पुणे अशा अनेक शहरांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ही बाजारपेठ आता भंडारा शहरात भरणार आहे. २० ते २२ मार्च या कालावधीत भंडाऱ्यातील ग्राहकांना अमृतपेठ थेट बाजारपेठेत दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.
ज्यांना पारंपरिक शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत नाही, अशा व्यक्तींना उद्योगक्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, उद्योजकतावाढीसाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे हे अमृत संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. म्हणूनच स्थानिक नवउद्योजकांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने भंडारा येथे अमृतपेठ भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन भंडाऱ्यातील राजस्थानी भवन येथे आयोजित करण्यात आले असून, दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत भंडारा शहरासह परिसरातील नागरिकांना खरेदीचा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या भव्य प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. ग्राहकांना येथे ज्वेलरी कलेक्शन, ड्रेस मटेरियल, गृहउद्योगातून तयार केलेली उत्पादने, लेदर बॅग, बेकरी प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे आदींची खरेदी करता येणार आहे. ही सर्व उत्पादने स्थानिक असून, अनेक उत्पादने हाताने तयार केलेली (हँडमेड) आहेत. या प्रदर्शनामध्ये भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून नवउद्योजक उत्साहाने सहभागी होणार आहेत. ग्राहकांना उत्पादकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना उत्पादनांची गुणवत्ता, वापर, किंमत आणि वैशिष्ट्ये याबद्दल थेट माहिती मिळू शकते आणि उद्योजकांना ग्राहकांच्या अपेक्षा आणि आवडीनिवडी समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन विक्रीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. याची दखल घेऊन अमृत संस्थेने एक पाऊल पुढे टाकून या उद्योजकांच्या उत्पादनांना अमृतपेठ डॉट कॉम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे उद्योजकांना केवळ स्थानिक नव्हे, तर संपूर्ण राज्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या व्यवसायाला नवी बाजारपेठ उपलब्ध होणार असून, उत्पन्नवाढीला मोठा हातभार लागणार आहे.
ऑफलाइन प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्राहकांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या आवडी-निवडी आणि बाजारातील ट्रेंड समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे व्यवसायात आवश्यक बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती करता येते. याच कारणामुळे अनेक उद्योजक या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी यामधून मोठ्या संधीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भंडारा शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 'व्होकल फॉर लोकल' हा संदेश या प्रदर्शनातून प्रभावीपणे देण्यात येत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना देण्याचे कार्यही केले जात आहे. महिला बचत गट, लघुउद्योजक, गृहोद्योजक आणि नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणारे तरुण-तरुणी यांना या व्यासपीठाचा मोठा उपयोग होणार आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिवस आणि वेळ : २० ते २२ मार्च २०२६. रोज सकाळी १० ते रात्री नऊ वाजेपर्यंत...
स्थळ : राजस्थानी भवन, जलाराम चौक, भंडारा
अधिक माहितीसाठी संपर्क :
8857934732, 9112228775, 9325173445, 8605984358
पत्ता :
अमृत भंडारा जिल्हा कार्यालय,
श्री साई किराणा घर, शास्त्रीनगर,
स्टेशन रोड, भंडारा - ४४१९०४
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment