छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेतून झाली ३.१० लाख रुपयांची विक्री - अमृत महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेतून झाली ३.१० लाख रुपयांची विक्री

दोन दिवसांच्या प्रदर्शनात ग्राहकांनी भरभरून खरेदी केल्याने स्थानिक उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेतून झाली ३.१० लाख रुपयांची विक्री मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेतून झाली ३.१० लाख रुपयांची विक्री अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाला छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनातील एकूण ६० स्टॉल्सवरून या दोन दिवसांमध्ये सुमारे तीन लाख १० हजार रुपयांच्या मालाची विक्री झाली. त्यामुळे स्टॉलधारकांसाठी हा उपक्रम खरोखरच उपयुक्त ठरला.

शिवम मंगल कार्यालयात १४-१५ मार्च रोजी ही बाजारपेठ भरवण्यात आली होती. या प्रदर्शनात ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन स्थानिक उत्पादनांची भरभरून खरेदी केली. घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे तसेच विविध गृहोपयोगी वस्तूंनी सजलेले ६० स्टॉल ग्राहकांच्या गर्दीने भरून गेले होते. एकूण विक्रीने तीन लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्याने या उपक्रमाचा उद्देश साध्य झाल्याची भावना व्यक्त केली.

या उपक्रमामुळे नवउद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची चांगली संधी मिळाली आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढला. सहभागी स्टॉलधारकांनी अमृत संस्थेचे आभार मानले आणि असे उपक्रम वारंवार आयोजित करण्याची मागणी केली.

या प्रदर्शनात स्वयंसिद्ध मतिमंद मुलांच्या कार्यशाळेचा एक विशेष स्टॉलही लावण्यात आला होता. या मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंनाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या उत्पादनांची विक्रीही समाधानकारक झाली. त्यांनीही अमृत संस्थेचे विशेष आभार मानले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमृत संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृतसखी मंजू कुलकर्णी, ऋचा शर्मा, तसेच अमृतमित्र रामेश्वर साळुंके, विनया कुलकर्णी, चिंतेश जोशी आणि अजय कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 01:49 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 01:49 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement