छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबीएन फाउंडेशनच्या बैठकीत झाला अमृत संस्थेच्या योजनांचा जागर - अमृत महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबीएन फाउंडेशनच्या बैठकीत झाला अमृत संस्थेच्या योजनांचा जागर

सदस्यांकडून मिळाला चांगला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबीएन फाउंडेशनच्या बैठकीत झाला अमृत संस्थेच्या योजनांचा जागर मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबीएन फाउंडेशनच्या बैठकीत झाला अमृत संस्थेच्या योजनांचा जागर अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : बीबीएन फाउंडेशनची ५०५वी साप्ताहिक बैठक उस्मानपुरा येथील श्रीनिधी हॉलमध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, त्या अंतर्गत विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात.

या वेळी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच विभागीय व्यवस्थापक ओमकार शेटे आणि जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनीही अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. ड्रोन प्रशिक्षण, अमृत बेकरी, सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन (अमृत सूर्यमित्र), अमृत आयात-निर्यात, अमृतपेठ, अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर), तसेच अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण (ईडीपी) या योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इतर उपक्रमांचीही थोडक्यात माहिती देण्यात आली.

या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे, अर्जप्रक्रिया आणि पुढील टप्प्यांबाबत या वेळी उपस्थितांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे या संधींचा लाभ कसा घ्यायचा याची सर्वांना कल्पना आली.

या बैठकीला सागर बोरुळकर, अतुल जोशी, निलेश सातोनकर, अनंत साठे, संतोष जोशी, सीए कौस्तुभ पातुरकर, डॉ. स्वप्नील पाटनूरकर, हेमंत पिंपळगावकर, राजेश्वरराव पेरूमला, मिलिंद उंबरीकर, जितेंद्र राहुरीकर, सतीश जोशी, सुनील बासरकर, लक्ष्मीकांत पांडे, कमलाकर हटेकर, जयश्री भालेराव, अशा जोशी आणि दीपाली सातरकर आदी सदस्य उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement