स्वप्न उद्योजकतेचे, ध्येय स्वावलंबनाचे
परांडा (धाराशिव) : धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे २१ मार्च रोजी उद्घाटन झाले. सक्षम उद्योजक घडवणे हे मुख्य ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेली महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या फॅशनच्या युगात हाताने बनवलेल्या अर्थात हँडमेड दागिन्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हेच लक्षात घेऊन महिलांना स्वतःच्या कलेद्वारे घरबसल्या व्यवसाय सुरू करता यावा, या उद्देशाने हे विशेष प्रशिक्षण डिझाइन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महिलांना केवळ दागिने बनवणेच नव्हे, तर त्यातील तांत्रिक बारकावे आणि व्यावसायिक कौशल्येही शिकवली जाणार आहेत.
प्रशिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये :
तांत्रिक कौशल्य : विविध प्रकारचे आधुनिक आणि पारंपरिक दागिने बनवण्याचे प्रात्यक्षिक.
कच्चा माल व साधने : दागिने बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याचा अचूक वापर.
फिनिशिंग आणि डिझाइन : बाजारपेठेतील मागणीनुसार दागिन्यांना व्यावसायिक लूक देणे.
उद्योजकता मार्गदर्शन : स्वतःचा ब्रँड कसा तयार करावा आणि मार्केटिंग कसे करावे याचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.
'अमृत' संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा हा संयुक्त उपक्रम परांडा परिसरातील महिलांना केवळ एक कला शिकवण्यापुरता मर्यादित नसून, त्यांना एक यशस्वी उद्योजिका' म्हणून समाजात ओळख निर्माण करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक महिलांनी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65469
पत्ता : अमृत संस्थेचे धाराशिव जिल्हा कार्यालय,
ऋणानुबंध, तळमजला, वृंदावन कॉलनी,
जिल्हा कारागृहासमोर, धाराशिव
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment