अमरावतीमध्ये अमृत संस्थेतर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल युवक-युवतींनी तातडीने करावा अर्ज

अमरावतीमध्ये अमृत संस्थेतर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मुख्य फोटो
अमरावतीमध्ये अमृत संस्थेतर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी अतिरिक्त फोटो

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. शेती, मॅपिंग, व्हिडिओ शूटिंग, औद्योगिक तपासणी, सरकारी सर्वेक्षण, सुरक्षा व्यवस्था तसेच लॉजिस्टिक सेवांमध्ये ड्रोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे युवक-युवतींसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. अमरावतीतील सोपान कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार असून, दोन जून २०२६पासून ते सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आणि पात्र व्यक्तींनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण खुल्या प्रवर्गातील अशा युवक-युवती व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना, शिष्यवृत्ती किंवा प्रशिक्षणाचा लाभ मिळत नाही. समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :

- डीजीसीए मान्यताप्राप्त रिमोट पायलट (छोटे ड्रोन) प्रशिक्षण

- अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

- आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती

- प्रत्यक्ष ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण

- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअर मार्गदर्शन

- स्वयंरोजगारासाठी नवीन संधी

ड्रोन क्षेत्रामध्ये उपलब्ध करिअर संधी

- कृषी क्षेत्रात औषध फवारणी व सर्वेक्षण

- जमीन मोजणी व मॅपिंग

- व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी

- औद्योगिक सर्वेक्षण

- बांधकाम व रोड सर्व्हे

- डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक्स सेवा

- सरकारी व खासगी सर्वेक्षण प्रकल्प

ड्रोन प्रशिक्षणामध्ये काय शिकवले जाणार?

- ड्रोनचे प्रकार व त्यांची माहिती

- ड्रोन सुरक्षा नियम व डीजीसीए नियमावली

- ड्रोन उडवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण

- कॅमेरा हाताळणी आणि मॅपिंग

- बॅटरी, जीपीएस, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम

- आपत्कालीन परिस्थिती हाताळणे

- ड्रोन मेन्टेनन्स आणि मूलभूत दुरुस्ती

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड, पॅन कार्ड, टी. सी. (ज्यामध्ये जात नमूद असेल), दहावी बोर्ड प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी), डोमिसाइल प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट (एमबीबीएस डॉक्टरकडून), पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, सही, स्वयंघोषणापत्र

मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुक व पात्र युवक-युवतींनी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7249451152

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 07:09 PM News publication time | Views: 461 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 07:09 PM News publication time | Views: 461 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement