फलटणमध्ये अमृतवर्गात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बुद्धिमत्ता, टीमवर्क व विचारमंथनाला चालना देणारे खेळ

फलटणमध्ये अमृतवर्गात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मुख्य फोटो
मुख्य फोटो

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये अमृत संस्थेतर्फे अमृतवर्ग उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात बौद्धिक खेळ, टीमवर्क अ‍ॅक्टिव्हिटी, सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा, तसेच समूहचर्चा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होता.

विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व चर्चांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली कल्पकता, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्यास हातभार लावला. अमृतवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शाळेच्या शिक्षकवर्गाने, तसेच संस्थेच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अशा उपक्रमांची विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मोठी गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 08:39 AM News publication time | Views: 335 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 08:39 AM News publication time | Views: 335 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement