छत्रपती संभाजीनगरमधील महिलांचे स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल - अमृत महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमधील महिलांचे स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल

अमृत संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन घेतली विविध योजनांची माहिती

छत्रपती संभाजीनगरमधील महिलांचे स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगरमधील महिलांचे स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने विविध उपयुक्त योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. या योजनांची माहिती घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी लक्ष्यित गटातील महिलांनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला भेट दिली.

या वेळी अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी महिलांना संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन, व्यवसायासाठी आर्थिक साह्य, कर्ज व्याजपरतावा योजना यांचा समावेश होता. महिलांनी आपल्या शंका मोकळेपणाने मांडल्या. त्यावर अक्षय लंबे आणि योगेश रोडे यांनी योग्य मार्गदर्शन करून योजना कशा प्रकारे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात हे महिलांना समजावून सांगितले. या योजनांची माहिती घेतल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, प्रशिक्षण घ्यावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी..

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 07:00 PM News publication time | Views: 184 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 07:00 PM News publication time | Views: 184 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement