योजनांच्या माहितीसाठी दिनदर्शिका तयार करणारी अमृत ही पहिली शासकीय संस्था - अमृत महाराष्ट्र

योजनांच्या माहितीसाठी दिनदर्शिका तयार करणारी अमृत ही पहिली शासकीय संस्था

अहिल्यानगरच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे कौतुकोद्गार

योजनांच्या माहितीसाठी दिनदर्शिका तयार करणारी अमृत ही पहिली शासकीय संस्था मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने आपल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी अमृत दिनदर्शिका तयार केली आहे. योजनांची माहिती देण्यासाठी असा उपक्रम राबवणारी अमृत ही पहिली शासकीय संस्था आहे, असे मत अहिल्यानगरचे जिल्हा माहिती अधिकारी अमोल महाजन यांनी व्यक्त केले. अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमोल महाजन यांना अमृत दिनदर्शिका दिली आणि दिनदर्शिकेचे जिल्ह्यातील वितरण सुरू केले. या वेळी अमृतसखी गौरी कुलकर्णी उपस्थित होती. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून अमृत दिनदर्शिका तयार करण्यात आली असून, संपूर्ण राज्यात या दिनदर्शिकेचे वितरण सुरू झाले आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

कार्यालय पत्ता : अमृत संस्थेचे अहिल्यानगर कार्यालय,
वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 10:05 PM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 10:05 PM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement