परतवाडा येथे अमृत संस्थेतर्फे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू - अमृत महाराष्ट्र

परतवाडा येथे अमृत संस्थेतर्फे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू

रोजगार उपलब्धतेसाठी महिलांना कौशल्यप्राप्ती होण्याच्या दृष्टीने आयोजन

परतवाडा येथे अमृत संस्थेतर्फे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू मुख्य फोटो
परतवाडा येथे अमृत संस्थेतर्फे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू अतिरिक्त फोटो

परतवाडा : अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे दोन जानेवारी २०२६ रोजी अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. हा उपक्रम अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, जिल्हा उपव्यवस्थापक ऋषीकेश कथलकर, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी राजेश सुने, तसेच एमसीईडीचे आयोजक गजेश बहाड उपस्थित होते.
या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी अमृत संस्थेच्या कार्याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक लाभार्थी महिला यशस्वी उद्योजक झालीच पाहिजे, असे आवाहन करून त्यांनी महिलांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक प्रेरणा दिली.
एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी राजेश सुने यांनी प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांना मार्गदर्शन करून अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, तसेच त्या योजनांच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सक्षमपणे कसा उभा करता येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रशिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षक ज्योत्स्ना राऊत मॅडम मार्गदर्शन करत असून, या बॅचमध्ये ३० महिला सहभागी झाल्या आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आधुनिक ब्युटी पार्लर व्यवसायाचे कौशल्य प्राप्त होणार असून, आत्मविश्वासासह आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

अमृत विभागीय कार्यालयाचा पत्ता :
आशीर्वाद बिल्डिंग, म्हाडा बिल्डिंगसमोर, मालटेकडी, अमरावती.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227673, 9112227635, 7249451152

प्रशिक्षण केंद्राचा पत्ता : जयस्तंभ चौक, परतवाडा, जि. अमरावती.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: ऋषिकेश हरिश कथलकर News publisher name | Date: 02-01-2026 News publication date | Time: 03:29 PM News publication time | Views: 530 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: ऋषिकेश हरिश कथलकर News publisher name | Date: 02-01-2026 News publication date | Time: 03:29 PM News publication time | Views: 530 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement